Type Here to Get Search Results !

मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणीचा गोंधळ; कित्येक मतदार यादीतून गायब.........


 दरवेळी नव्याने नोंदणी करावी लागते याची माहिती नसलेले गाफील मतदार मतदानापासून वंचित,,,,,,,,,,


 

दैनिक गाववाला गावकरी खबर्‍या पैठण प्रतिनिधी गौतम सोनवणे.



 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दरवेळी नव्याने नोंदणी करावी लागते, याची माहिती अनेक सुशिक्षित मतदारांना नसल्याने गाफील राहीलेल्या कित्येकांनी नव्याने नाव नोंदणी केली नव्हती.काल पार पडलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या लोहगाव केंद्रावरील  यादीतून अनेक मतदारांचे नावे  वगळले गेल्याचे समोर आले आहे.यामुळे यंदा हजारो मतदारांना मतदान करता न आल्याने वंचित राहावे लागले आहे.

निवडणूक लढवू इच्छीत पक्षाच्या वतीने आपल्या संपर्कातील व आपल्यालाच मतदान करतील अशांची परंपरागत  नवीन नोंदणी करून घेतली परंतु सरळमार्गी व हुशार उमेदवारांच्या शोधात राहणाऱ्यांना फटका बसला.जर निवडणूक विभागानी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असती तर मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली असती.

विधानसभा, लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील मतदार नोंदणी एकदा केली तर तो मतदार हयात असताना कित्येक वर्षे काही करावं लागतं नाही.परंतू पदवीधर मतदार यादीत नाव राहण्यासाठी  दरवेळी नवीन नोंदणी करावी लागते. जुनी नोंदणी आपोआप रद्द होते.हे माहिती व जाणिव नसल्याने मतदार गाफील राहिले.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार( लोक प्रतिनिधी कायदा १९५०- कलम २७) पदवीधर मतदार यादी दर सहा वर्षांनी नव्याने तयार होते. गेल्या वेळी मतदान केले म्हणजे यावेळी नाव असेलच, असे नाही. प्रत्येक वेळी फार्म- १८भरून पदवीचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. मात्र निवडणूक विभागानी जनजागृतीच केली नाही.


पैठण तालुक्यातील लोहगाव  येथील मतदान केंद्रावर अनेक मतदारांनी सांगितले की, मागील निवडणुकीत आम्ही मतदान केले होते.परंतू या वेळी केंद्रावर गेल्यावर यादीत नावच नव्हते.म्हणूण मतदान न करता माघारी जावे लागत आहे.


या सध्याच्या परीस्थितीत  मतदानाची टक्केवारी वाढली असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र मतदारांची संख्या घटली आहे. निवडणूक कार्यालयाने पुढील वेळी गाव पातळीवर जनजागृती करावी, अशी मागणी मतदार करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88