पेन रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड
पेण शहरासाठी होणारा दूषित पाणी पुरवठा हा केवळ स्थानिक प्रश्न राहिला नसून तो सार्वजनिक आरोग्यासाठी निगडित अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे.शहरातील दोन प्रमुख मोठ्या गटाराचे सांडपाणी भोगावती नदीत सोडले जाते.हा आरोप सातत्याने होत आहे.हेच पाणी शहरासाठी पुरविले जाते ,यावर आवश्यक ती प्रक्रिया केली जात नाही.त्यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी "माझं पेण" संघटना २०२४ पासून पाठपुरावा करीत आहे. संघटनेने आंदोलने,रास्तारोको करण्यात आला होता. आणि हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. आणि नागरिकांना दूषित पाणी पुरवठा करू नये याविषयी उपाययोजना करण्याचेनिर्देश दिले होते.परंतु आजपर्यंत अपेक्षित बदल झाल्याचे दिसून आले नाही.
या पार्श्वभूमीवर "माझं पेण" संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक १७ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेला कथित निष्काळजीपणा बाबत नगर परिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्या बाबत पत्र सादर करण्यात आले.
शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका वाढतो.याची झळ सर्वसामान्य नागरिकांना जास्त पोहचते,याबाबत प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत.
पेण करांच्या संयमाची परीक्षा आत्ता खूप झाली आरोग्याविषयी कोणतीही तडजोड नाही.भोगावती नदीचे प्रदूषण रोखावे.सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया करूनच शहराला पाणी पुरवठा करावा अन्यथा न्यायालयीन लढाई, करावी लागेल.
नागरिकांचे आरोग्य महत्वाचे यासाठी पुढील पावले संघटनेच्या माध्यमातून उचलली जातील.
सदर निवेदन देण्यास "माझं पेण" चे पदाधिकारी.गणेश लक्ष्मण तांडेल,राजेंद्र शंकर पाटील,सुरज चिंतामणी पाटील, सौ समिता राजेंद्र पाटील, श्री सी.आर.म्हात्रे सर , श्री सुनील (आप्पा) सत्वे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या