Type Here to Get Search Results !

पेण.. आमदारांच्या रावे गावात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.. कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी केले उद्घाटन..



पेण रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड


पेण तालुक्यातील आमदार रविंद्र पाटील यांचे जन्मगाव़ रावे येथील आयुष्मान भारत आरोग्य उपकेंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणा-या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध आजारांवरचे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ रविंद्र पाटील यांनी या जन आरोग्य शिबिराचे थाटात उद्घाटन केले. पेण तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले गाव आणि लगतच्या परिसरातील गावांतील नागरिकांनी या शिबिरात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या जनमदिनाचे औचित्य साधत पूरवसंधेलाच आज १८ जुलै ते २२ जुलै या कालावधीत पेण तालुक्यातील रावे, वडगाव, गडब, कामार्ली, जिते, हमरापूर आदी आरोग्य केंद्रामधे या अनुषंगाने विविध आजारांवरचे मोफत उपचार नागरिकांना मिळण्यासाठी मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या आरोग्य शिबिराप्रसंगी उपस्थित मान्यवर

भाजप कार्यकतें आदिनाथ पाटील, पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील नखाते, पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी समीर सानप, रावे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ए. एम. डुकरे, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी जिते डॉक्टर अपर्णा मालंगे, डॉक्टर समाधान पाटील, प्रिया पाटील, जगदीश पाटील, राजेश म्हात्रे, सानिका पाटील, लता म्हात्रे, सुभाष भोजने, सर्व आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते


भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा पक्षसंघटन महामंत्री आणि रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यामाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पनवेल येथील उन्नती हॉस्पिटल आणि आयसीयू पनवेल यांचे सहकार्य लाभले आहे.


रावे येथे शिबिराच्या उद्धाटनप्रसंगी बोलताना सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की, नागरिकांना आरोग्यसेवेतून उपचार मिळणे हीच खरी जनसेवा आहे. या मानवतावादी भावनेतून हे शिबिर आयोजित केले आहे. सुमारे १० हजार लोकसंख्या असलेले रावे गाव आणि परिसरातील गावांना या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे आरोग्य विषयक उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरविण्या साठी हा मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


शिबीरातील आजारावरचे उपचार

तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रोग निदान

आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन

रक्त तपासणी, लघवी तपासणी आणि ईसीजी

आयुष्मान भारत कार्ड नोंदणी आणि वाटप

अशा प्रकारे शिबिरात संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.


या शिबिरा प्रसंगी रावे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. मोफत तपासणी आणि मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

.


ही शिबिरे पुढील पाच दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र परिसरातील पेण ग्रामीण भागांतील गावांमध्ये सुरु राहणार असून या आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे पेण तालुका आरोग्य विभागाने केले आहे. 


फोटो..मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना कृषी पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील पेण तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते व‌ इतर आरोग्य कर्मचारी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या