उपसंपादक योगेश पाटील निकम
*छत्रपती संभाजीनगर*: आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुर्व्यास पौर्णिमेनिमित्त *श्री नाथ आश्रम, श्रीक्षेत्र वेरूळ* येथे भक्तिभावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
*मठाधिपती परमपूज्य श्री नाथयोगीनी सदगुरू अक्का महाराज* यांच्या प्रेरणेने आणि *श्री सदगुरू विठ्ठल बाबा, सद्गुरु दिनकर बाबा,सदगुरू सुभाष बाबा* यांच्या शुभ आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा धार्मिक सोहळा साजरा होणार आहे.
*कार्यक्रमाचे वेळापत्रक:*
कार्यक्रम *बुधवार, दिनांक 29 जुलै 2026* रोजी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत *श्री मच्छिंद्रनाथ भगवान यांचा अभिषेक आणि फलाहार* ने सुरुवात होईल. त्यानंतर *गुरुपूजन, 56 पदार्थांचा भोग दर्शन* होईल. यानंतर प्रवचन आणि आरती होणार आहे. *दुपारी 12.00 वाजता महाप्रसादाचे* आयोजन करण्यात आले आहे.
*दीपोत्सव:*
गुरु पौर्णिमेच्या आदल्या दिवशी *मंगळवार दि. 28/07/2026 रोजी सायंकाळी 7 वाजता* श्री नाथ आश्रम येथे *1100 दीप लावून दीपोत्सव* साजरा करण्यात येणार आहे.
आश्रमाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. "गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव" या भावनेने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
*स्थळ:* श्री नाथ आश्रम, श्रीक्षेत्र वेरूळ, लक्ष्मीनारायण गणपती कॉलनी, ता. रतनपुर, जि. छत्रपती संभाजीनगर

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या