तोंडोळी-गाडेगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये घन कचरा दोन लाख बत्तीस हजार रुपयाच्या 'चेक' घोटाळा उघड; सरपंच अन् ग्रामसेवकाची संगनमताने लूट!
कोणतेही काम न करता २ लाख ३२ हजारांचा अपहार; चार व्यक्तींच्या नावावर धनादेश फाडून सरकारी तिजोरीवर दरोडा.
मुख्य संपादक गजानन पाटील देठे
तालुक्यातील तोंडोळी-गाडेगव्हाण गट ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा मोठा स्फोट झाला आहे. सरपंच अनिता ज्ञानेश्वर बनकर आणि ग्रामसेवक पांडुरंग सवडे यांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या खात्यातून तब्बल दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा अपहार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणत्याही प्रकारची विकासकामे न करता, केवळ कागदोपत्री घोडे नाचवून चार व्यक्तींच्या नावे धनादेश (Checks) देऊन ही रक्कम हडप करण्यात आली आहे.
घोटाळ्याचा 'चेक'नामा: कोणाला किती वाटले?
ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खालील व्यक्तींच्या नावाने रकमा काढण्यात आल्या आहेत:
१. बाबासाहेब किसन बनकर: ५८,००० रुपये
२. रावसाहेब बाळाजी बनकर: ५८,००० रुपये
३. दत्तू शेनफड बनकर: ५८,००० रुपये
४. प्रभू सखाराम बनकर: ५८,००० रुपये
असावी असा संशय आहे, दोन लाख बत्तीस हजार रुपये रुपायाच्या घोटाळा
काम शून्य, भ्रष्टाचार पूर्ण!
गावात कोणत्याही प्रकारचे काम झालेले नसताना या चार व्यक्तींना ही रक्कम कोणत्या कारणास्तव देण्यात आली? असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. ग्रामसेवक पांडुरंग सवडे आणि सरपंच अनिता बनकर यांनी पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या मर्जीतील व्यक्तींच्या नावे हे चेक दिल्याचे उघड झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांची आक्रमक मागणी:
ग्रामपंचायतीचा पैसा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो, मात्र येथे सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून ग्रामपंचायतीची 'लूटमार' सुरू केली आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करावी, तोंडोळी-गाडेगव्हाण येथील संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधणार!
या भ्रष्टाचाराचे पुरावे आता समोर आले असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि गट विकास अधिकारी (BDO) यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या