Type Here to Get Search Results !

आदिवासी युवकांचा वंचित बहुजन आघाडीकडे विश्वासाचा कौल; बदलाच्या दिशेने ठाम पाऊल..



प्रतिनिधी - शारदा ठुले 


लोणावळा : खंडाळा-लोणावळा परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या शेकडो युवकांनी परिवर्तनाच्या दिशेने ठाम पाऊल टाकत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने परिसरात नव्या राजकीय ऊर्जेला चालना मिळाली. लोणावळ्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समूह शिल्प परिसरात झालेल्या या कार्यक्रमात युवकांनी सामाजिक न्याय, हक्क आणि प्रगतीच्या विचारांवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, उपाध्यक्ष शकील बागवान व राजू गायकवाड, संपर्कप्रमुख भरत गुप्ते, मावळ तालुका अध्यक्ष नितीन भाऊ ओव्हाळ, उपाध्यक्ष कैलास मोरे, सचिव निरंजन कांबळे, प्रवक्ते अर्जुन लगाडे, संघटक श्री डोळस, वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका महिला अध्यक्षा वृषालीताई वीरगुजर, युवक अध्यक्ष संदीप कदम, महिला संघटक नीता मोरे तसेच दिनेश शिंदे, दयानंद रोकडे, किरण भालेराव, संजय कांबळे, वंचित बहुजन महिला आघाडी मा.अध्यक्ष मनीषाताई ओव्हाळ, प्रवीणभाऊ भवार, लतिफ शेख, संघटक माजी उपनगराध्यक्ष आर. डी. जाधव, पंचशील सुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे आदिवासी युवकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून संघटित शक्तीच्या बळावर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या