Type Here to Get Search Results !

तळेगावात आगीच्या घटनांनंतर सुरक्षा अलर्ट; माय होम सोसायटीत फायर सेफ्टी प्रशिक्षण

 तळेगावात आगीच्या घटनांनंतर सुरक्षा अलर्ट; माय होम सोसायटीत फायर सेफ्टी प्रशिक्षण


प्रतिनिधी - शारदा ठुले 


तळेगाव दाभाडे परिसरात एका दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेश देणारा उपक्रम गोदाई नगर येथील माय होम सोसायटीत राबविण्यात आला. दिनांक १९ मार्च २०२६ रोजी बजाज ऑटो एल.टी.डी. यांच्या पुढाकारातून सोसायटीतील रहिवाशांसाठी फायर सेफ्टी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला अग्निशमन विभागाचे अधिकारी श्री. संदीप सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. भरत नाना राजिवडे, श्री. किशोर हसुरकर, श्री. महेश राऊत यांच्यासह सोसायटीचे चेअरमन श्री. अविनाश हट्टेखोर व खजिनदार श्री. देवेंद्र चौधरी यांनीही उपस्थित राहून उपक्रमाला पाठिंबा दिला. प्रशिक्षण सत्रामध्ये अग्निशामक दलाच्या जवानांनी आग लागल्यास घ्यावयाच्या तत्काळ उपाययोजना, अग्निशामक यंत्रांचा योग्य वापर, तसेच जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माय होम सोसायटीसह क्रिश अंगण, त्रिमाऊंट, ऋतुगंध व सुनंदा हिट्स या परिसरातील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या प्रशिक्षणानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांचे मनःपूर्वक आभार मानत, अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या