गाढेगव्हानमध्ये भीमजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘रूट मार्च’; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज!
जालना मुख्य संपादक गजानन पाटील देठे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या** वतीने गाढेगव्हान (ता. जाफ्राबाद) येथे बुधवारी दि. २२ रोजी जंगी ‘रूट मार्च’ (पथसंचलन) काढण्यात आला.
शांततेचा संदेश आणि सुरक्षेची खात्री बाळगुण गाढेगव्हाण येथे काही कारणास्तव भिम सैनिकांनी १४ एप्रिल रोजी डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नव्हती. या अनुषंगाने दिनांक २३ एप्रिल रोजी भीम जयंती साजरी करण्याचे ठरवण्यात आले आहे.
भीमजयंतीचा सण मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा व्हावा, या उद्देशाने टेंभूर्णी पोलिसांनी गाढेगव्हान गावातील प्रमुख मार्गावरून संचलन केले. यावेळी पोलीस दलाच्या वाहनांसह मोठा फौजफाटा तैनात होता. या मार्चद्वारे पोलिसांनी नागरिकांना सुरक्षेची खात्री देत, कोणत्याही अफवांना बळी न पडता सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.
शिस्तबद्ध संचलन
गावातील मुख्य चौक, मंदिर परिसर आणि संवेदनशील भागातून हा मार्च काढण्यात आला. पोलिसांच्या या शिस्तबद्ध संचलनामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या...........
उत्सवाच्या काळात समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्वांनी गुण्यागोविंदाने भीमजयंती साजरी करावी, यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
सपोनि कैलास भारती टेंभूर्णी पोलीस ठाणे
नागरीकांनी भीम जयंती शांततेत साजरी करावी.दोन समाजात जो कोणी समाज कंठक तेड निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल त्यांची गय केली जाणार नाही.अशा समाज कंठकावर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल.....पि.एस .आय बाबासाहेब खार्डे




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या