जल जीवन मिशनचा बोजवारा! गाडेगव्हाणमध्ये महिनाभरापासून पाणी टंचाई; ग्रामसेवक, सरपंचांचे दुर्लक्ष
विहिरीत पाणी नाही, तरीही आडवे बोअर घेऊन बिल उचलले? 'हर घर जल' योजनेचा ग्रामस्थांना मनस्ताप!
जाफ्राबाद (विशेष प्रतिनिधी):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन' योजनेचा जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथे पुरता बोजवारा उडाला आहे. गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, योजनेवर लाखो रुपये खर्च होऊनही ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर परिस्थितीकडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. सवडे आणि सरपंच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
विहिरीत पाणी नाही, मग बिलं कशाची?
गाडेगव्हाण येथे जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या शेजारीच धरणाचे पाणी असूनही नियोजनाअभावी विहिरीला पाणी उतरत नाही. तरीही विहिरीमध्ये ५० ते ७० फुटांपर्यंत 'आडवे बोअर' घेण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे, या बोअरचा गावाला थेंबभरही फायदा झालेला नाही, मात्र या कामाची बिले लाटण्यात आल्याची चर्चा गावात सुरू आहे. प्रत्यक्ष कामापेक्षा कागदोपत्री घोडे नाचवून निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
महिनाभरापासून गाव तहानलेले!
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना गाडेगव्हाण ग्रामस्थांना गेल्या एक महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. "योजनेचा आम्हाला फायदा काय? फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी ही योजना आहे का?" असा संतप्त सवाल महिला विचारत आहेत.
ग्रामसेवक आणि सरपंचांवर रोष
गावातील या पाणी प्रश्नाबाबत ग्रामसेवक श्री. सवडे आणि सरपंचांना वारंवार अवगत करूनही त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता मात्र पाण्यासाठी तडफडत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया
गाडेगव्हाणमध्ये जल जीवन मिशनचा खेळखंडोबा! १० फूट पाईपसाठी गाव महिनाभरापासून तहानलेले
माजी संचालक विलासराव बनकर यांचा संताप; ग्रामसेवक आणि सरपंचांच्या 'नाकर्तेपणा'मुळे पाण्यासाठी वणवण!
'हर घर जल' या संकल्पनेला जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथे प्रशासकीय अनास्थेचा ग्रहण लागला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च झाल्याचे कागदावर दिसत असले, तरी प्रत्यक्षात गावाला गेल्या एक महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. या गंभीर परिस्थितीला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच पूर्णपणे जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलासराव शेषराव बनकर यांनी केला आहे.
केवळ १०-१५ फूट पाईपचा गरज आहे
विलासराव बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाच्या पाणीपुरवठा विहिरीमध्ये पाणी उपलब्ध आहे, परंतु विहिरीतील मोटर खाली सोडण्यासाठी केवळ १० ते १५ फूट पाईपची आवश्यकता आहे. इतक्या शुल्लक कामासाठी आणि किरकोळ खर्चासाठी ग्रामसेवक व सरपंचांनी या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. केवळ एका पाईपअभावी संपूर्ण गावाला महिनाभरापासून पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे, ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीत ५० ते ७० फुटांपर्यंत आडवे बोअर घेऊन त्याची बिले काढण्यात आली, मात्र त्याचा गावाला थेंबभरही फायदा झाला नाही. विहिरीच्या बाजूलाच धरणाचे पाणी असतानाही नियोजनाअभावी ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. ग्रामसेवक श्री. सवडे आणि सरपंचांच्या या आडमुठ्या धोरणामुळे 'जल जीवन मिशन' ही योजना गाडेगव्हाणसाठी 'मृत' ठरली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
"प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गाडेगव्हाणमधील महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. जर तातडीने १०-१५ फूट पाईप टाकून पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा
प्रतिक्रिया
विलासराव शेषराव बनकर (माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती) यांनी दिला आहे





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या