Type Here to Get Search Results !

राजेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ; इनरव्हील क्लबचा उपक्रम कौतुकास्पद.

 प्रतिनिधी - शारदा ठुले 


मावळ तालुक्यातील दिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी येथे दि.३० मार्च २०२६ रोजी इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती व इनरव्हील क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या स्वच्छतागृहासाठी पाण्याची टाकी (सिंटेक्स), लहान पंप, बागेला पाणी देण्यासाठी पाईप बंडल, शाळेच्या कंपाउंड भिंतीचे रंगकाम, विद्यार्थ्यांसाठी डबे, पारंपरिक खेळांसाठी दोरीउडी व घुंगरू काठी, अभ्यासासाठी तक्ते तसेच ग्रंथालयासाठी पुस्तके अशा विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे औक्षण व स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी इनरव्हील क्लब पुणे अध्यक्षा सौ. माधवी पुरोहित, इनरव्हील क्लब मावळ शक्ती अध्यक्षा सौ. ज्योतीताई भरत राजिवडे, दिवडचे सरपंच गणेश राजीवडे, मावळ शक्तीच्या सचिव सुरैया शेख, इनरव्हील पुणेच्या सचिव सौ. सुजाता जयवंत, मावळ शक्तीच्या खजिनदार सौ. राजश्री नाईकरे, पुणे क्लबच्या खजिनदार सौ. सविता तामाने, एडिटर सौ. रेखा बरीदे तसेच भरत नाना राजिवडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतात अध्यक्षा माधवी पुरोहित यांनी शाळेसाठी साहित्य, रंगकाम आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून देताना समाधान वाटत असल्याचे सांगून पुढील काळातही मदत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले, तर ज्योतीताई राजिवडे यांनीही शाळा व विद्यार्थ्यांसाठी कायम सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. सरपंच गणेश राजीवडे यांनी ग्रामीण भागातील शाळांना निधीअभावी अडचणी येत असल्याचे नमूद करत अशा संस्थांच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक गणेश दिवर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते महेंद्र राजीवडे यांनी मानले. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश राजीवडे, शशिकांत पडवळ, शशिकांत राजीवडे, नितीन शेडगे, भिकाजी राजीवडे, चंद्रभागा राजीवडे, स्नेहलताई राजीवडे, छायाताई राजीवडे, अश्विनी बेंद्रे, मंजुळाताई सावळे तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना फळे व अल्पोपहार देऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या