Type Here to Get Search Results !

कार्ला येथे इंद्रायणी नदीवर विसर्जन घाटासाठी भूमिपूजन; खासदार निधीतून १० लाखांची तरतूद.

 प्रतिनिधी - शारदा ठुले 


मावळ तालुक्यातील कार्ला येथे इंद्रायणी नदीकाठी विसर्जनासाठी सुसज्ज घाट उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या प्रकल्पाचे भूमिपूजन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या कामांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक विश्वजीत श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते दि.२९ मार्च २०२६ रोजी पार पडले. इंद्रायणी नदीकाठावर विसर्जन करताना गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना चिखल, घसरट जागा आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे सुरक्षित आणि सोयीस्कर विसर्जन घाट उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून कामाला चालना दिली असून या घाटामुळे भविष्यात विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, जिल्हा संघटक अंकुशराव देशमुख, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, माजी सरपंच सागर हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे, सतीश मोरे, ग्रामसेवक सरपाते भाऊसाहेब, दिनेश जाधव, विभागप्रमुख सहादू बडेकर, मनसे तालुका उपाध्यक्ष सुनिल सावळे, विशाल वसंत हुलावळे, मंगेश हुलावळे, सचिन भीम हुलावळे, बंटी हुलावळे, संतोष गायकवाड, गणेश हनुमंत हुलावळे, आदेश हुलावळे, आशिष हुलावळे, आकाश हुलावळे, संकेत हुलावळे, आकाश केदारी, साहिल राजू हुलावळे, साहिल गुरुनाथ हुलावळे, गिरीश गणेश हुलावळे, मयुर रवी हुलावळे, अमर गुरव, योगेश जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे यांनी करत प्रकल्पाच्या गरजेवर सविस्तर भाष्य केले


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या