Type Here to Get Search Results !

जाफराबाद रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; ४ जण गंभीर जखमी

टेंभुर्णी/ प्रतिनिधी बी.डी.सवडे   अकोलादेव : जाफराबाद रोडवर आज दि. २७ शुक्रवारी तिध वाजेच्या दरम्यान दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरात धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींमध्ये जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील तीन रहिवाशांचा आणि बुलडाणा जिल्ह्यातील एका युवकाचा समावेश आहे. अपघाताची अधिक माहिती अशी की , गाडेगवान येथील तिन जन मोटारसायकल क्रमांक एम एच २१ सी डी ६४ १२ हे जाफराबादवरुन टेंभुर्णी कडे येत असताना मोटरसायकल क्रमांक एम. एच. २८  ,  ५५०९ ही मोटर सायकल जाफराबाद कडे जात असताना दोन्ही मोटर सायकलची समोरासमोर भीषण अपघात झाला.हि घटना    जाफराबाद रोडवर पोदार इंग्लिश स्कूल जवळ घडली. दोन्ही दुचाकी भरधाव वेगात होत्या. वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून, चालक आणि पाठीमागे बसलेले  रस्त्यावर फेकले गेले. जखमींची नावे:   संजय हिवाळे (वय ४५ वर्ष, रा. गाडेगव्हाण, ता. जाफराबाद)   रामदास घोरपडे (वय ६० वर्ष, रा. गाडेगव्हाण, ता. जाफराबाद)   संभाजी घोडे (वय २५ वर्ष, रा. गाडेगव्हाण, ता. जाफराबाद)   एक अनोळखी युवक (रा. जिल्हा बुलडाणा)  हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतीचा हात दिला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चारही जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेने जवळच्या टेंभुर्णी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.या घटनेचा   जाफराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या