Type Here to Get Search Results !

एकवीरा देवी चैत्री यात्रेसाठी वाहतूक बंदोबस्त कडक; लोणावळा परिसरात मोठे बदल

 एकवीरा देवी चैत्री यात्रेसाठी वाहतूक बंदोबस्त कडक; लोणावळा परिसरात मोठे बदल


प्रतिनिधी - शारदा ठुले 


पुणे ग्रामीण भागातील मावळ तालुक्यातील वेहेरगाव, कार्ला परिसरात होणाऱ्या श्री एकविरा देवी मंदिर येथे चैत्री यात्रा उत्सव २०२६ दरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विशेष आदेश जारी केले असून २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत, या आदेशानुसार कार्ला फाटा ते एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून भाविकांच्या वाहनांसाठी अग्रसेन हॉटेल, लाजवंती महाविद्यालय तसेच दुर्गा परमेश्वरी परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु. टोलनाका या मार्गावर जड व अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी जड वाहतूक वडगाव फाट्यावरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वळवण्यात येणार आहे, तर मुंबईकडून पुण्याकडे येणारी जड वाहने कुसगाव बु. टोलनाक्यावरून द्रुतगती मार्गाने वडगाव फाटा मार्गे पुढे सोडण्यात येणार आहेत, याशिवाय भाविकांची हलकी वाहने वगळता इतर सर्व मोठ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर बंधनकारक करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, दरवर्षी या यात्रेला हजारो भाविक उपस्थित राहतात त्यामुळे अशा प्रकारचे वाहतूक निर्बंध गर्दी नियंत्रण व अपघात टाळण्यासाठी आवश्यक ठरतात  तसेच यंदाही पालखी सोहळा, विशेष दर्शन व सुरक्षा व्यवस्थेमुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या