पीएम किसान योजनेचा 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा एकदाची संपली आहे. केंद्र सरकारने हा हप्ता या दिवशी जमा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसानंतर हा हप्ता बँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. काय आहे मोठी अपडेट?
13 मार्च रोजी पीएम किसानचा हप्ता
पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता (PM Kisan 22nd Installment) कधी जमा होणार याची शेतकऱ्यांमध्ये प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. समाज माध्यमावर केलेल्या पोस्टनुसार शेतकरी सन्माननिधी योजनेचा हप्ता येत्या 13 मार्च रोजी जमा होईल. याविषयीची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यापूर्वी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर या तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या