BMC Election Exit Poll 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता येणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत. असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिल्याचे पहायला मिळत आहे.राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर राज्यासह संपूर्ण देशाची नजर आहे. उद्धव ठाकरे सत्ता राखणार की महायुती सत्ता मिळवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक महत्त्वाचे नेते आणि नगरसेवक शिंदेंसोबत गेल्यामुळे शिंदे आणि ठाकरेंकडे सर्वांची नजर लागलेली आहे. आता मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता येणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत. असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महायुतीचा विजय होण्याची शक्यता
समोर आलेल्या आकडेवारीमध्ये मुंबई महापालिकेत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांना मिळून 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण 62-65 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीला एकूण 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
JVC च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 97 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 32 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 52 ते 59 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मनसेला 2 ते 5 आणि काँग्रेसला 21 ते 25 जागा मिळू शकतात. तर इतरांना 6 ते 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे.एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 32 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 52 ते 59 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंपेक्षा वरचढ ठरत आहेत. आजही मुंबईकरांचे प्रेम ठाकरे कुटुंबियांवर आहे हे यातून स्पष्ट होत आहे. हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. या पोलचे अंदाज खरे ठरले तर एकनाथ शिंदे सत्तेत असतील मात्र खऱ्या अर्थाने ठाकरेंना जास्त जागा मिळाल्यास हा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का असेल
.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या