“जालन्यात भाजपचा ऐतिहासिक विजय!”
दैनिक गाववाला गावकरीखबऱ्या महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल
मुख्य संपादक गजानन पाटील देठे
जालना शहरातील मतदारांनी पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी व मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीला जालना महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत दिले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे जालना महानगरपालिका पूर्णतः भाजपच्या ताब्यात आली असून, शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
या निवडणुकीत जालना शहरातील सर्व स्तरातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विकास, पारदर्शक कारभार आणि स्थिर नेतृत्वाला कौल दिला आहे. हा विजय म्हणजे केवळ पक्षाचा नव्हे, तर जालना शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने दिलेला विश्वासाचा जनादेश आहे.
या जनादेशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत, मतदारांना दिलेली सर्व आश्वासने वेळेत, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.
प्राधान्यक्रमाने राबविण्यात येणारी विकासकामे —
▪️ पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करणे
▪️ अंतर्गत रस्ते व ड्रेनेज सुधारणा
▪️ स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन
▪️ आरोग्य सुविधा व शासकीय दवाखान्यांचा दर्जा उंचावणे
▪️ डिजिटल सेवा व ई-गव्हर्नन्स
▪️ युवकांसाठी क्रीडा सुविधा व रोजगार संधी
▪️ महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना
भाजपच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगरपालिका भाजप अध्यक्ष भास्कर आबा दानवे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, विरोधी पक्षातील सहकार्यांसह, जालना महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम, प्रशासनदृष्ट्या पारदर्शक आणि विकासदृष्ट्या आदर्श बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून जालना शहराला महाराष्ट्रातील आदर्श महानगरपालिका म्हणून नावारूपास आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला
.https://youtu.be/Ao5oQLUQdmw?si=i3nZThgxA-A3aSJL


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या