बोटावरची मतदान केल्याची शाई दाखवा अन मोफत दाढी, कटिंग मिळवा माणुसकी सलुन..
माणुसकी सलुन मध्ये मतदान केलेल्या दात्यांची मोफत दाढी,कटिंग व महिलांचा शाल श्रीफळ देत सन्मान करण्यात आला.
उपसंपादक योगेश पाटील निकम
मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावे व मतदान १००% व्हावे,याकरिता सुमित पंडित ची धडपड.
मतदानाची टक्केवारी वाढावी या करीता सुमित पंडित गेल्या ८ दिवसांपासून चार्ली चाप्लीन च्या वेशभुषा करुन मतदान १००% व्हावे या करिता जनजागृती करित आहे. आता शेवटच्या मतदानाच्या दिवशी त्याने अनोखी शक्कल लढवली होती. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं,याकरिता त्याने आपल्या माणुसकी सलुन,सईदा काॅलनी सारा वैभव,जटवाडा रोड येथे ३३ मतदात्यांची दाढी कटिंग व १८ महिलांचा शाल,श्रीफळ आणि प्रशस्तिपत्र देवुन समाजसेविका पुजा पंडित यांनी सन्मानित केले. सुमित शासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृतीचे कार्य अनेक वर्षापासून करीत आहे.त्याने या आधी सुद्धा मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी मुलगी झाली कि पित्यांची दाढी कटिग मोफत, वृक्ष लागवड करणाऱ्या दात्यांची सलून सेवा मोफत, टॉयलेट झाडणाऱ्या दात्यांची सलून सेवा मोफत, सैनिकांची चांदी च्या वस्ताऱ्याने मोफत सलुन सेवा अश्या विविध योजना सुमित राबवतो. विशेष म्हणजे त्याच्या माणुसकी सलून मध्ये वाचनालय देखील आहे.तरी संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त मतदात्यांनी मतदान करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान सुमित पंडित यांनी नागरिकांना केले होते.
नागरिकांनी या योजनेचे कौतुक करीत ह्या योजनेचा लाभ घेतला माणुसकी सलुन मध्ये सकाळी ७ वाजल्या पासुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करुन आल्यावर दाढि कटिंग मोफत करुन देण्यात आली व मतदान केलेल्या महिलांचा सन्मान समाजसेवीका पुजा पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मतदान जागृती अभियानामध्ये ज्युनियर चार्ली फाउंडेशन चे कलाकार सोमनाथ स्वभावणे, यांनी अनेक बुथवर जाणवु मतदानाची जनजागृती केली या जनजागृती अभियानात सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे सुमित पंडित,
समाजसेविका पुजा पंडित आदिनी मदतकार्य केले.यात वीजय निंबाळकर,मनोज वखरे,गणेश जाधव,सह अनेक मतदारांनी या योजनेचा लाभ घेत यांनी सक्रिय सहभाग घेतला

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या