Type Here to Get Search Results !

टेंभुर्णीतून खेडोपाडी लाईसन मधून अवैध देशी दारूची बॉक्स पार्सल सेवा सुरू; , प्रत्येक गावामध्ये किराणा दुकानांतून देशी दारूची सर्रास विक्री!

 टेंभुर्णीतून खेडोपाडी  लाईसन मधून अवैध देशी दारूची बॉक्स पार्सल सेवा सुरू; ,



प्रत्येक गावामध्ये  किराणा दुकानांतून देशी दारूची सर्रास विक्री!



दैनिक गाववाला गावकरीखबऱ्या

​टेंभुर्णी (विशेष प्रतिनिधी):

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी आणि परिसरात अवैध देशी दारू विक्रीने थैमान घातले असून, स्थानिक लायसनधारक देशी दारू दुकानातून सर्रासपणे खेडोपाड्यांमध्ये दारूचे बॉक्स पार्सल पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण बेकायदेशीर कारभाराकडे टेंभुर्णी पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, टेंभुर्णी येथील मुख्य देशी दारू लायसन दुकानातून ग्रामीण भागात अवैध दारूचा पुरवठा केला जात आहे. गावोगावच्या लहान-मोठ्या किराणा दुकानांमध्ये, टपऱ्यांवर आणि आडबाजूच्या ठिकाणी ही दारू पोहोचवण्याचे काम थेट लायसनधारकाकडून किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून केले जात आहे. वाहनांमधून देशी दारूचे बॉक्सच्या बॉक्स रोज संध्याकाळी व रात्रीच्या वेळी खेड्यापाड्यांत पोहोचवले जात आहेत.

​किराणा दुकाने बनली अवैध मद्यविक्रीची केंद्र

पूर्वी केवळ परवानाधारक दुकानांत मिळणारी देशी दारू आता गावागावांतील किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत आहे. लायसन दुकानदाराने गावातच ‘होम डिलिव्हरी’ किंवा ‘गावपोच पार्सल’ यंत्रणा सुरू केल्यामुळे तरुण पिढी आणि मजूर वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. या अवैध पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, घरगुती हिंसाचार आणि वादाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

​टेंभुर्णी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

एकीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर कारवाईचे दावे करत असताना, टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र हा अवैध प्रकार उघडपणे सुरू आहे. दारूचे बॉक्स वाहतूक करणारे वाहने रस्त्यांवरून सर्रास धावत असताना पोलिसांना याची माहिती कशी नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या दुर्लक्षामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​कारवाई कधी होणार? सर्वांचे लक्ष!

खेड्यापाड्यांमध्ये अवैध देशी दारूच्या या महापुरामुळे महिला वर्ग आणि ग्रामस्थ अत्यंत त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्वरित कठोर पावले उचलून, अवैध दारूचा पुरवठा करणारे लायसनधारक दुकानदार आणि स्थानिक अवैध विक्रेत्यांवर धडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता या बेकायदेशीर साखळीवर पोलीस प्रशासन कधी आणि काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88