कन्नड तालुका प्रतिनिधी -कृष्णा करंगळे
कन्नड शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत कारवाई करत ‘लाल हिना’ ब्रँडच्या मिरची पावडर आणि हळद पावडरचा एकूण ६२६ किलो साठा जप्त केला आहे. २२ ऑक्टोबर रोजी मेसर्स एस. एम. एजन्सी या अन्न विक्री प्रतिष्ठानावर ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत २ लाख ९६ हजार ३८० रुपये असल्याचे वृत्त आहे.
नेमका किती साठा जप्त?
या कारवाईत ४१८ किलो मिरची पावडर, ज्याची किंमत २ लाख १३ हजार १८० रुपये आहे, तसेच २०८ किलो हळद पावडर, ज्याची किंमत ८३ हजार २०० रुपये आहे, असा एकूण ६२६ किलो मसाला साठा जप्त करण्यात आला.
तपासणीत आढळल्या त्रुटी
संबंधित प्रतिष्ठानाच्या तपासणीदरम्यान स्वच्छतेसाठी अपुरी जागा, कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी न केलेली असणे आणि ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी व्यवस्था नसणे,
जप्त करण्यात आलेला साठा सीलबंद करून पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठेवण्याची कार्यवाही करण्यात आली.
अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या कारवाईमुळे अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शेवट :
या कारवाईनंतर अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, जप्ती म्हणजे संबंधित मसाला भेसळयुक्त असल्याचे अंतिम प्रयोगशाळा निष्कर्ष नव्हेत; त्याबाबत अधिकृत अहवालाची माहिती महत्त्वाची ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या