Type Here to Get Search Results !

अविनाश राठोड टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी; कायदा-सुव्यवस्थेसह अवैध धंद्यांवर नियंत्रणाचे मोठे आव्हान

 


टेंभूर्णी ३१ मे जाफ्राबाद तालुक्यातील टेंभूर्णी पो-लीस ठाण्याच्या प्रभारी पदावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांनी पदभार स्वीकारला असून, विद्यमान प्रभारी कैलास भारती यांची भोकरदन येथे बदली करण्यात आली आहे. टेंभूर्णीसारख्या संवेदनशील आणि मोठ्या बाजारपेठेच्या गावात नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.


टेंभूर्णी हे तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून येथील राजकीय,

सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या घडामोडींचा प्रभावतालुका व जिल्हास्तरावर जाणवत असतो. त्यामुळे येथील पोलीसठाण्याच्या प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.


टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, सट्टा, मटका, अवैध दारू विक्री व वाहतूक, गुटखा तस्करी, अवैध वाळू उपसा व वाहतूक तसेच वृक्षतोड यांसारख्या बेकायदेशीर प्रकारांच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असतात. त्यामुळे या प्रकारांना आळा घालणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करणे, हे नव्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोरील प्रमुख आव्हान राहणार आहे.

परिसरातील नागरिकांनी अविनाश राठोड यांच्याकडून 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या