Type Here to Get Search Results !

तळेगावात अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

 तळेगावात अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..



मावळ तालुका प्रतिनिधी पुणे जिल्हा शारदा ठुले 


तळेगाव शहरातील एका निवासी इमारतीजवळ खेळत असलेल्या अवघ्या आठ वर्षांच्या मुलीशी अयोग्य वर्तन केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी त्वरीत गुन्हा नोंदवून संबंधित तरुणाला अटक केली. उपलब्ध माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पावणेपाचच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या इमारतीखाली खेळण्यासाठी गेली होती. खेळताना ती शेजारील गॅरेज परिसरात गेली असता तेथे काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला मागून धरून तिच्याशी अशोभनीय कृत्य केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली आणि रडतच घरी परतत तिने आई-वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पालकांनी तत्काळ संबंधित गॅरेजमध्ये जाऊन विचारणा केली आणि नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद कैफ नोशाद मलिक (वय २२, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास सुरू असून भरदिवसा आणि गर्दीच्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे तळेगाव परिसरात संताप व्यक्त होत आहे. लहान मुलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या