उपसंपादक योगेश पाटील निकम
वडोदबाजार पोलीसांच्या मदतीने तीला माणुसकी वृध्द सेवालय येथे पुनर्वसनासाठी केले दाखल
ती बीहार राज्यातील असल्याचे समजते वडोदबाजार पोलीस घेत आहेत नातेवाईकांचा शोध..
वडोदबाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.७-१-२६ रोजी वडोदबाजार गावांमध्ये एकच खळबळ उडाली की लहान मुलांना चोरणारी महिलांची टोळी गावांमध्ये आली आहे सर्वतोपरी भीतीचे वातावरण निर्माण झाले.झोपडपट्टि भागात एक ३२ वर्षाय महिला हातात एक पांढऱ्या रंगाची पोतडी घेऊन फिरतानां स्थानिक नागरिकांना आढळली महिलेला वडोदबाजार येथील नागरीकांनी महिलेस लहान मुले संशयीत चोर समजून पडले.ती खुप हिंसक झाली होती तीला नागरीकांनी चोप हि दिला ती काही एक सांगत नव्हती हा सर्व प्रकार स्थानिक नागरिकांनी डायल ११२ ला फोन करुन घटनेची माहिती वडोदबाजार पोलीसांना दिली पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनिल इंगळे साहेब यांनी तातडीने आपले पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांना पाचारण केले असता महिला अंमलदार यांनी सदर महिलेस ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन येथे आनले असता महिलेची चौकशी केली तर ती महिला वेडसर वृत्तीने वागत होती तीला आपली भाषा हि समजत नव्हती ती महाराष्ट्रातील नसुन बाहेरची आहे तीला आपली भाषा हि समजत नव्हती ती नाव गाव सुद्धा सांगत नव्हती तीस शासकीय रुग्णालय फुलंब्री येथे प्रथमोपचार साठि नेले असता डॉक्टरांनी सांगितले की हि घरातुन भरकटलेल्या अवस्थेत फीरत आहे.तीला मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तीला पोलीसांनी माणुसकी वृध्द सेवालय गावंदरी तांडा जटवाडा रोड संभाजीनगर येथील समाजसेवक सुमित पंडित यांच्या सेवालयात तात्पुरत्या निवाऱ्यासाठी दाखल केले.या सामाजिक कार्यात वडोदबाजार पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस उपअधीक्षक पुजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक वडोदबाजार,मुस्ताक पटेल,शैलेश गोरे,रुपचंद नागलोद, सुनील मैंद,पो.हे.का,महिला अंमलदार नीता दांडगे मॅडम समाजसेवीका पुजा पंडित आदिनी मदतकार्य केले,
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन परिपूर्ण माहिती घेऊन मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी मदत केली...
सदर महिलेच्या नातेवाईक शोध घेत असल्याने वडोदबाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या ३२ वर्षीय महिलेला एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मदत केली. नागरीकांनी शोशल मीडियावर अफवा पसरवू नये यात योग्य ती कारवाई करण्यात येईल.ती मानसिक आजाराने पीडित आहेत. हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरीक आत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा ? प्रश्न ह्या एका महिलेचाच नाही, तर अजून कितीतरी असतील.ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेशुद्ध मिरवत असतील समाजातील वाईट नजरे सामोर मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का? समाजाच दायित्व काहीच नाही का ? जीवनात संकट सांगून येत नसतात. आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला, जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत. तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल.आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल
---------श्री सुनील इंगळे सहाय्यक पोलिस निरीक्षक वडोदबाजार

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या