Type Here to Get Search Results !

राज्यातील सत्तासूत्रांत बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत..

 राज्यातील सत्तासूत्रांत बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत..


मावळ तालुका प्रतिनिधी पुणे जिल्हा शारदा ठुले 


अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार, याबाबतची अनिश्चितता आता जवळपास संपुष्टात आली आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सकारात्मक असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत असून, त्या संदर्भातील निरोप घेऊन डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतं आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या अचानक निधनानंतर पक्षात एकजूट राखण्यासाठी आणि संघटन मजबूत ठेवण्यासाठी पवार कुटुंबातीलच एखाद्या सदस्याकडे पक्षाची सूत्रे असावीत, असा आग्रह भाजप नेतृत्वाकडून असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीकडून घेतलेल्या या निर्णयाची औपचारिक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार असून, त्यानंतर शनिवारीच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या