Type Here to Get Search Results !

बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात..

 बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात..


मावळ तालुका प्रतिनिधी पुणे जिल्हा शारदा ठुले.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विमानाला आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान किरकोळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमान उतरताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघात गंभीर स्वरूपाचा नसून विमानातील काही कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार सुरक्षित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचे वातावरण तापलेले असून प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने बारामतीसह परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून वरिष्ठ राजकीय नेते आणि कुटुंबीय घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, लँडिंगदरम्यान नेमका कोणता तांत्रिक दोष निर्माण झाला, याचा तपास नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून केला जाण्याची शक्यता असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या