Type Here to Get Search Results !

*रनेरा येथे राबवण्यात आली गांव स्वच्छता मोहीम* अपघातांना आळा घालण्यासाठी गावकरी यांच्या पुढाकार

 अपघाताला आळा घालण्यासाठी मोठे पाऊल 


रनेरा वरून जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा, पालापाचोळा व घाण साचली होती. यामुळे वाहनचालकांना वाहण चालवीतांना अडथळे निर्माण होत होते ज्यामुळे अनेक दा अनेक लहान-मोठे अपघात घडत होते. ग्रामवासियांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली; मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर युवकांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला.

श्रमदानातून गावकरी एकवटले ज्यामध्ये त.मु.स अध्यक्ष सुनील पाटील, पो.पाटील अजयसिंग बर्वे, सरपंच योगराज टेंभरे, बंटी गजभिये,पीबी टेंभरे सर, गंगाधर डोंगरे,मनोहर कावळे , हिरालाल पारधी, निशाल उईके, मनोज पारधी, राजकुमार उईके. यांच्या श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


प्रतिनिधी 

विजय घोडीचोर सिहोरा 

महाराष्ट्र लोक न्यू


ज चॅनल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या